ऑनलाइन नोंदणी

21 व्या शतकातील जगातील सर्वात मोठ्या नियोजित शहरांपैकी एक म्हणजे आपली नवी मुंबई. सिडकोने भूसंपादन करून केलेल्या या नवी मुंबई प्रकल्पामध्ये JNPT बंदर (भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर) व त्यावर आधारित CFS, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र- SEZ, ONGC, BPCL आणि TTC (Trans Thane Creek) MIDC यांचा समावेश आहे.


या प्रकल्पांमुळे, हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आणि होणार आहेत . पण दुर्दैव असे कि स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता बाहेरून भरती केली जाते. नंतर हेच बाहेरुन आलेले अधिकारी स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना त्रास देण्याचे व अडचण निर्माण करण्याचे काम करतात.


हे सगळे थांबवण्याचे उद्दिष्ट, “पुष्पा परशुराम प्रतिष्ठान”, या संघटनेचे आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना, आपल्याच जमिनीवर निर्माण केलेल्या प्रकल्पांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. नोकऱ्या मिळवण्यासाठी एक संघटित आणि प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे कि तुम्ही खालील अर्ज भरून घ्यावे. तुमची माहिती व रेझुमे कंपन्यांकडे पोचवून तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढील माहिती तुमच्या रजिस्टर नंबरवर देण्यात येईल.


Personal Details (वैयक्तिक माहिती)


Address Details (पत्ता तपशील)


Education Details (शिक्षण तपशील)