संस्थेचे उद्दिष्ट


शैक्षणिक

शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अंगणवाडी / बालवाडी, पुर्वमाध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालय, तसेच अनु. जाती / अनु. जमाती, भटक्या व विमुक्त जाती तसेच आदिवासी, वनवासी इतर मागासवर्गीय यांच्या साठी निरनिराळ्या भाषिक अल्पसंख्याक शाळा, आश्रमशाळा, अध-अपंग शाळा, मुकबधीर शाळा, वस्तीशाळा, रात्रशाळा, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा विशेष प्रचार, मॉन्टेसरी टिचर, ट्रेनिंग कोर्स, कृषी महाविद्यालय, कायदे विषयक महाविद्यालय, वैद्यकिय महाविद्यालय, संगीत महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, डिफेन्स करीअर अकॅडमी स्थापन करणे व चालवणे.

संस्थेच्या माध्यमतून विद्यार्थ्यांना सगणकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणे, शासनाने निश्चित केलेले अभ्यासक्रम / कोर्स शिकविणे, यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र उभारणे, अत्याधुनिक क्षेत्रात संगणकाचे महत्व पटवून देणे.

शहरी व ग्रामिण भागात विद्यार्थी पालक मेळावे आयोजित करून शिक्षणाचे महत्व पटवून देणे तसेच दहावी, बारावी व पदवी नंतरच्या विविध अभ्यासक्रमाची माहिती करून देणे, समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी अभ्यास केंद्र वसतीगृह चालविणे, वह्या, पुस्तके, गणवेश या शालोपयोगी वस्तूचे वाटप करणे, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या / बक्षिसे देऊन त्याचा गुणगौरव करणे, समाजामध्ये ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी मोफत ग्रंथालय / वाचनालय स्थापन करणे व चालविणे.


सामाजिक

समाजातील अनिष्ट चालिरिती, रूढी-परंपरा, अज्ञान हे नष्ट करणे. त्याकरीता निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविणे, समाज मंदिर, संस्कार मंदिर बांधणे, तसेच जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करून त्यांच्यात बंधूभाव, स्नेहभाव व एकोपा निर्माण करणे, त्यासाठी मागणी शिबीराचे आयोजन करणे.

हिंदू धर्मातील परपरेनुसार चालत आलेले देव देवतांचे पुजन व उत्सव साजरा करणे. तसेच भाविकांना व्रत, वैफल्य भजन, किर्तन, हरीपाठ करण्याची व्यवस्था करणे. तसेच वेगवेगळ्या साधुसंताचे धार्मिक प्रवचनाचे त्याचप्रमाणे समाज परिवर्तनाचे कार्यक्रम आयोजित करणे. तसेच संताच्या जयंती / पुण्यतिथी उत्सव साजरे करणे.

परीसरातील गरीब व गरजू व्यक्तीना / भाविकांना राहण्याची, भोजनाची व धर्मशाळेची व्यवस्था करणे. तसेच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकिय, कला, क्रिडा व धर्मादायी उपक्रम राबविणे. तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने समाजात एकता व बंधुभाव निर्माण करण्यासाठी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण तसेच सार्वजनिक गणेशउत्सव, सार्वजनिक गौरा गणपती, शिवजयती, सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिकाला हे सण / उत्सव साजरे करणे. तसेच थोर संत-महंत, राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी साजन्या करणे.

परीसरातील बालक व महिला यांच्या विकासासाठी वृद्धांच्या आधारासाठी व सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी बालसंस्कार केंद्र, अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम बाधणे व चालविणे. तसेच ग्रामिण व शहरी परीसरातील धैर्यवान, कर्तबगार, निस्पृह, राजकीय, सामाजिक, पत्रकार, जेष्ठ माजी सैनिक, गुणवंत खेळाडू विद्यार्थी तसेच परीसरातील आदर्श शिक्षक व विविध क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करणे. त्याकरीता सामाजिक पुरस्काराचे आयोजन तसेच वितरण करणे.

संगीत, कला, संस्कार वर्ग यांची स्थापना करून मानवी जीवनाचा विकास घडवून आणणे. सर्व सामान्य जनतेसाठी उद्यान, योग केंद्र, धर्मशाळा, विश्रामगृह याची स्थापना करून विकास करणे. त्यासाठी आश्रमशाळा, तसेच वसतीगृह बांधणे व चालविणे. सांस्कृतिक, कला व क्रिडा

भारतीय संस्कृती विकास व जपणूक यासाठी समाजामध्ये शारिरिक शिक्षणाविषयी, आरोग्य शिक्षणाविषयी व खेळाविषयी स्फुर्ती निर्माण करणे व महत्व पटवून देणे. पारंपारिक कलांची जपणूक करणे. नाविन्यपुर्ण कलाची दालने विद्यार्थ्यांना खुली करणे, तरुण/तरुणीच्या उपजत कला गुणांना वाव देणे, त्यासाठी सौदर्य स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा भरवून त्यांना उत्तेजन देणे, नृत्य गायन, शिवणकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गीत गायन स्पर्धा, वकृत्व अशा कला गुणांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे. मैदानी खेळ खेळण्यासाठी व्यायामशाळा व क्रिडा सकुलनाची स्थापना करणे, निरनिराळ्या खेळाचे प्रशिक्षण देणे, तसेच वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे.


आरोग्य

सामाजिक आरोग्यासाठी रक्तदान नेत्रदान, कुटूंबकल्याण, लसीकरण, वैद्यकीय शिबिरे, औषधोपचाराची सोय, रक्तपेढी, औषधे, चश्मे व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची सुविधा निर्माण करणे, वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग शिक्षण, वैद्यकीय महाविद्यालय या सुविधा पुरविणे, तसेच कृष्ठरोग, एड्सग्रस्त, एच. आय. व्ही. ग्रस्त, कर्करोग, अंधत्व नियंत्रण, कुटूंब कल्याण या रोगाबाबत व रोग प्रतिबंधक उपाय, रुग्णांची घ्यावयाची काळजी, रुग्णाची मानसिकता याची लोकांना माहिती करून देणे. त्यासाठी तज्ञ व नामवंत व्यक्तींना बोलावून व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करून मार्गदर्शन करणे.

परीसरातील गौरगरीब जनतेस औषधे, अपंगाना निरनिराळी उपकरणे उपलब्ध करून देणे, स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) म्हणून आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, समाजातील लोकाना आरोग्यसेवा, निवास, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे गोर-गरीब लोकासाठी रुग्णालय, दवाखाना, प्रसतिगृह, धर्मार्थ दवाखाने, बाल माता संगोपन केंद्र स्थापन करणे व चालविणे.