सामाजिक एकता :-
समाजातील अनिष्ट चालिरिती, रूढी-परंपरा, अज्ञान हे नष्ट करणे. त्याकरीता निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविणे, समाज मंदिर, संस्कार मंदिर बांधणे, तसेच जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करून त्यांच्यात बंधूभाव, स्नेहभाव व एकोपा निर्माण करणे, त्यासाठी मागणी शिबीराचे आयोजन करणे.
हिंदू धर्मातील परपरेनुसार चालत आलेले देव देवतांचे पुजन व उत्सव साजरा करणे. तसेच भाविकांना व्रत, वैफल्य भजन, किर्तन, हरीपाठ करण्याची व्यवस्था करणे. तसेच वेगवेगळ्या साधुसंताचे धार्मिक प्रवचनाचे त्याचप्रमाणे समाज परिवर्तनाचे कार्यक्रम आयोजित करणे. तसेच संताच्या जयंती / पुण्यतिथी उत्सव साजरे करणे.
परीसरातील गरीब व गरजू व्यक्तीना / भाविकांना राहण्याची, भोजनाची व धर्मशाळेची व्यवस्था करणे. तसेच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकिय, कला, क्रिडा व धर्मादायी उपक्रम राबविणे.
तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने समाजात एकता व बंधुभाव निर्माण करण्यासाठी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण तसेच सार्वजनिक गणेशउत्सव, सार्वजनिक गौरा गणपती, शिवजयती, सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिकाला हे सण / उत्सव साजरे करणे. तसेच थोर संत-महंत, राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी साजन्या करणे.
परीसरातील बालक व महिला यांच्या विकासासाठी वृद्धांच्या आधारासाठी व सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी बालसंस्कार केंद्र, अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम बाधणे व चालविणे.